

पुढारी ऑनलाईन: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ठाणे शहराचे सहाय्यक महापालिका आयुक्त महेश आहेर मारहाणप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या समर्थकांना नौपाडा पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, कोणत्याही क्षणी आव्हाड यांना देखील अटक होऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
ठाणे महापालिका आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांना पोलिसांनी अटक केली आहे. या मारहान प्रकरणातील आरोपी अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि विश्वंत गायकवाड यांना आव्हाडांचे समर्थन असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. यानंतर नौपाडा पोलिसांनी आरोपींना अटक करत, न्यायालयात हजर केले असता, ठाणे न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच आव्हाडांवर देखील याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.