

पुढारी ऑनलाईन: सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निर्णय राखून ठेवला आहे. आमचा सर्वोच्च न्यायालयावर संपूर्ण विश्वास आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.१६) दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाला. न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. मात्र निकाल आमच्याच बाजूने लागणार, असे मत भाजपचे नेते नारायण राणे यांनी व्यक्त केले; पण मला हे समजत नाही की हा आत्मविश्वास येतोच कुठून? असा सवालही राऊत यांनी केला. शिवसेना खरी कुणाची हे समजण्यासाठी निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हानही संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिले.