Kashmir Files film  
Latest

The Kashmir Files : काश्मिरी पंडितांचं मन हेलावून टाकणारं दु:ख (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

चित्रपट 'द कश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) दीर्घकाळ चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला चांगली प्रतिक्रिया मिळत आहे. द कश्मीर फाईल्सचा (he Kashmir Files) ट्रेलर ३ मिनिटे २३ सेकंदाचा आहे. चित्रपटामध्ये काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यावेळची राजकीय परिस्थिती दाखवण्यात आली आहे. हा टीझर एक हृदयस्पर्शी टीझर आहे जो लोकांना खूप आवडला आहे. हा चित्रपट बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा आहे. ते एका मुलाखतीत म्हटणतात-'काश्मीर हत्याकांडाची कथा मोठ्या पडद्यावर आणणे सोपे काम नाही. हा विषय अत्यंत संवेदनशीलतेने हाताळावा लागला. हा चित्रपट लोकांना खूप आवडेल.

त्याचबरोबर 'द कश्मीर फाईल्स' या चित्रपटाविषयी अभिनेत्री पल्लवी जोशी म्हणाली, 'चित्रपट जितका तितकाच चांगला असतो. दुसरीकडे, द काश्मीर फाईल्समध्ये, प्रेक्षक त्यावेळेपासून त्यांच्याशी जोडलेल्या भावना खरोखरच अनुभवू शकतात. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, भाषा सुंबळी, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक असे एकापेक्षा एक दमदार कलाकार आहे. या कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

'द काश्मीर फाईल्स' २६ जानेवारी २०२२ रोजी रिलीज होणार होता. परंतु कोरोना महामारीमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. . बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक ज्या चित्रपटाची वाट पाहत होते, तो चित्रपट ११ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT