डोंबिवली : सोनाराने ग्राहकांना आमिष दाखवत कोट्यवधींना फसवले | पुढारी

डोंबिवली : सोनाराने ग्राहकांना आमिष दाखवत कोट्यवधींना फसवले

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली येथील एका सोनाराने ग्राहकांना मुदत ठेवीवर आकर्षक परतावाचे आमिष दाखवले. यामध्ये त्‍याने गोल्ड स्कीमच्या गुंतवणुकीमध्ये माफक दरात सोने व डायमंड देण्यात येणार आहे. या योजनेत समाविष्ट व्हा अशी जाहिरात केली. यामध्ये ग्राहकांना 1 कोटी 56 लाख 24 हजार 539 रुपयांचा गंडा घातला.

श्रीकुमार पिल्लई हे सोनाराचे नाव असून त्‍याचे दुकान कल्याणच्या पश्चिमेला असणाऱ्या शिवाजी चौकात एस कुमार गोल्ड अँड डायमंड या नावाने आहे. दुकानात ग्राहक यावे यासाठी या सोनाराने मुदत ठेवीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवत जाहिरात केली. यामध्ये गोल्ड स्कीमच्या गुंतवणुकीमध्ये माफक दरात सोने व डायमंड देण्यात येईल, यासाठी मासिक भीसी योजनेचे आयोजन केले होते. याशिवाय फिक्स डिपॉझिट योजना सुरू करून त्यावर 15 ते 18 टक्के व्याजाने पैसे परत मिळतील अशी जाहिरात केली होती.

सोनेही नाही आणि पैसेही नाही

दरम्‍यान, रोषल गावित आणि त्यांची आई क्लाडेट परेरा यांनी या योजनेत पैसे गुंतवले. रोषल यांनी 2 लाख 40 हजार रुपये गुंतवले तर क्लाडेट यांनी 10 हजार रुपये गुंतवले होते. मात्र खूप दिवस झाले तरी दुकानातून सोने आणि पैसे मिळाले नाहीत. आता एस. कुमार ज्वेलर्सचे दुकान बंद करून फरार झाल्‍याने दुकानदाराने ग्राहकांच्या फसवले आहे हे लक्षात आले. त्यानंतर ग्राहकांनी सोनारावर पोलीस ठाण्यात गुल्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोनाराने आमिष दाखवून 1 कोटी 56 लाख 24 हजार 539 एवढ्या मोठ्या रकमेची ग्राहकांना फसवणूक केली आहे. याबाबत अधिक तपास महात्मा फुले पोलीस करत आहेत.

हे ही वाचा  

Back to top button