एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी धर्मावरून स्पष्टीकरण देताना 'माझं नाव ज्ञानेश्वरच… माझी बायको मला लाडाने दाऊद म्हणायची.' असे स्पष्टीकरण दिल्यानंतर आता सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला आहे.
माझी बायको मला लाडाने बिल क्लिंटन म्हणायची…अशा मिम्ज तयार करून व्हायरल केल्या जात आहेत. तर कुख्यात गॅगस्टर दाऊद इब्राहिमचा क्रिकेट मॅच बघताना फोनवर बोलतानाचा फोटो लावून 'हॅलो, मी ज्ञानेश्वर बोलतोय'अशा आशयाचे मिम्स तयार केले जात आहे.
तर एकदा शाहरूख म्हणाला होता…. माय नेम इज खान and the clarification story continues for other's, असेही मिम व्हायरल होत आहे.
समीर वानखेडे यांच्या वडिलांचा व्हिडिओ पोस्ट करून, 'मनोरंजनाचा धुवांधार मारा' अशी कॅप्शन देऊन पोस्ट केला जात आहे.
बॉलिवू़ड अभिनेत्री आणि अभिनेते चंकी पांडे यांची मूलगी अनन्या पांडे हिला व्हॉटसअॅप चॅट संभाषणात नाव आल्याने तिला चौकशीसाठी बोलवण्यात आले. यावेळी तिने मी गमतीने आर्यनला गांजा देऊ का? असे म्हटले होते. तिचे काही फोटो मिम्स म्हणून व्हायरल होत आहेत.
माझे नाव ज्ञानेश्वरच आहे पण माझी पत्नी मला लाडाने दाऊद म्हणत होती. माझ्या सर्व्हिस बुकवर ज्ञानदेव वानखेडे अशीच नोंद आहे. समीर आणि त्याच्या पत्नीचे लग्न मुस्लिम पद्धतीने झाले. काही काळानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर त्यांचा कायदेशीर पद्धतीनं घटस्फोट झाला. ड्रग्ज प्रकरणाशी माझा, माझ्या जातीचा, धर्माचा, नावाचा काय संबंध? असा प्रतिसवाल त्यांनी केला.
समीरच्या आईने त्यावेळी काय सांगितले मला माहीत नाही. सध्या व्हायरल होत असलेला निकाहनामा खरा असेल तर नेमकं काय झालेय मला माहीत नाही. हा निकाहनामा खरा असेलही. निकाह लागण्यावेळी समीरच्या आईनं काय सांगितलं हे मला माहिती नाही. हे लग्न व्हावे म्हणून समीरच्या आईने आम्ही दोघेही मुस्लिम असल्याचे सांगितले असावे.
मुस्लिम धर्मात जर आई वडील वेगवेगळ्या धर्माचे असतील तर त्यांचे लग्न होत नाही. मात्र, समीरच्या लग्नासाठी असे केले असावे. फेसबुकवर जे दाऊद वानखेडे अकाउंट आहे ते खोट्या पद्धतीने बनविलेले आहे. लोक प्रेमानं कुठल्याही नावाने हाक मारतात. समीरने ज्या कोट्यातून नोकरी मिळविली आहे, त्याच धर्माचे आम्ही आहोत. कुणाचाही हक्क त्याने हिरावला नाही
हेही वाचलं का?