मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या मुंबई संघातील चार खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह - पुढारी

मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या मुंबई संघातील चार खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या मुंबई संघातील चार खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आले असून त्यांच्या जागी चारही नवीन खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. वरिष्ठ संघातील चार खेळाडूंची चाचणी पॉजिटिव्ह आली आहे. शम्स मुलानी, साईराज पाटील, प्रशांत सोलंकी आणि सरफराज खान हे चार खेळाडू आहेत. असे सूत्रांनी सांगितले.

मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) या चारही खेळाडूंच्या जागी नवीन खेळाडूंची निवड केली असून त्याची घोषणा लवकरच करण्यात येईल. आम्ही चारही नवीन खेळाडूंची आरटी-पीसीआर चाचणी करत आहोत. त्यांचा अहवाल आल्यानंतरच ते संघासोबत येतील. आम्ही संघातील अन्य सदस्यांची आरटी-पीसीआर चाचणी देखील करत आहोत असे सूत्रांनी सांगितले.

मुंबईला चार नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत ब गटात ठेवण्यात आले आहे आणि ते आपल्या लीगच्या लढती गुवाहाटी येथे खेळतील. त्यांचा पहिला सामना कर्नाटकशी होणार आहे.

Back to top button