पुढारी ऑनलाईन डेस्क
सुंदर अभिनेत्री मृणाल दुसानिस हिच्या घरी नन्ही परीचे आगमन झाले आहे. 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली होती. तिने ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मृणाल सोशल मीडियावर फारशी ॲक्टीव्ह नसते. पण, मृणालने नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्रीने लिहिलंय, 'बाबांची छोटीशी लेक आणि आईचं संपूर्ण जग, आमच्या लेकीने घरात आगमन केलं आहे'.
मृणालने आपल्या मुलीचं नाव नुरवी असं ठेवलं आहे. तिने २४ मार्चला मुलीला जन्म दिला आहे. मृणालने २०१६ मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर नीरज मोरेसोबत अरेंज मॅरेज केलं होतं.
मृणालने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून माहिती दिली होती. तिने म्हटलं होतं की, तिच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. ही पोस्ट शेअर करत मृणालने लहान बाळाच्या कपडे, त्यांच्या खेळण्यांचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने लिहिले होते की, 'आम्ही आमच्या घरी येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी सज्ज झालो आहोत…आम्ही ठरवले आहे की आता जास्त वेळ झोपायचे नाही. घरासाठी वेळ द्यायचा. घर स्वच्छ ठेवण्यावर भर द्यायचा. कारण खूप आनंद घेऊन चिमुकली पावले आता घरभर फिरणार आहेत..'
मृणालने ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. तिच्या चाहत्यांसोबतच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी तिचे अभिनंदन केले होते. यामध्ये अश्विनी कासार, अभिज्ञा भावे, पियुष रानडे, श्रेया बुगडे,सुरुची आडारकर, सुकन्या मोने, चैत्राली गुप्ते, सावनी रविंद्र, जुई गडकरी, धनश्री काडगावकर यांचा समावेश होता.