जयपूर : पुढारी ऑनलाईन
'यूट्यूब स्टार' करण्याचे आमिष दाखवत नराधमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची ( Man rapes minor ) घटना राजस्थानमधील जोधपूर येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणातील पीडितीवर अत्याचार करणार्या नराधमाला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक १६ वर्षांची मुलगी मागील तीन ते चार वर्ष 'यूट्यूब'वर कॉमेडी व्हिडीओ अपलोड करत होती. काही महिन्यांपूर्वी तिची ओळख निजामुद्दीन उर्फ राज खान याच्याशी झाली. तुला 'यूट्यूब स्टार' करतो तसेच व्हिडीओच्या माध्यामातून लाखो रुपये मिळवून देतो, असे आमिष त्याने दाखवले. ओळखीचा गैरफायदा घेत व्हिडीओ करण्याच्या बहाण्याने त्याने पीडितेला फ्लॅटवर नेले. येथे तिच्यावर बलात्कार केला. याचे चित्रीकरणही केले.
या घटनेनंतर पीडित मुलगी हादरुन गेली. तिने याची तक्रार कुटुंबीयांकडे करणार असल्याचे सांगितले.नराधम निजामुद्दीन याने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. काही दिवस गेल्यानंतर पीडित मुलीने या घटनेची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत काही तासांमध्ये निजामुद्दीन याला अटक केली आहे.
हेही वाचलं का?