देशात मागील २४ तासात बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढल्याने दिलासा | पुढारी

देशात मागील २४ तासात बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढल्याने दिलासा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशात मागील २४ तास कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांच्या तुलनेत वाढ झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. देशात मागील २४ तासात 2लाख 09 हजार 918 नव्या केसेसची नोंद झाली, तर 959 मृत्यूची नोंद झाली. दिलासादायक चित्र म्हणजे दिवसभरात 2 लाख 62 हजार 628 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

देशातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या १८ लाख ३१ हजार २६८ वर गेली आहे. देशातील पॉझिटिव्हीटी रेट पुन्हा वाढला असून तो 15.77% झाला आहे. देशात आतापर्यंत 1,66,03,96,227 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

दरम्यान, अनेक राज्यातील परिस्थिती सुधारत असून सदर राज्यांनी प्रतिबंध हटविण्यास सुरुवात केली आहे. कर्नाटक सरकारने बहुतांश प्रतिबंध हटविण्याचा निर्णय शनिवारी घेतला होता. आजपासून येथील रात्रीची संचारबंदी देखील रद्द केली जात आहे. शाळाही उघडण्यात येणार आहेत.

राजस्थान, हरियाणामध्ये 1 फेब्रुवारीपासून शाळा, महाविद्यालये उघडणार आहेत. देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वीस हजारांवर गेली आहे. राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन आठवड्यात रूग्ण संख्येत एक तृतीयांशने घट झाली आहे. दरम्यान देशातील 75 लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. याबाबत काल (ता.३१) केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली होती.

हे ही वाचलं का ?

Back to top button