देवेंद्र फडणवीस 
विदर्भ

देवेंद्र फडणवीस : नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे सेना-राष्ट्रवादीला कापरं

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : देवेंद्र फडणवीस यांनी आज नाना पटोलेंच्या पाळत ठेवण्याच्या वक्तव्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला.

त्यांनी 'नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची घाबरगुंडी उडाली आहे. पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना कापरं भरलं आहे. त्यांना जेवण जात नाहीय, आणि पाणीही पिता येत नाहीय. ते अत्यंत घाबरलेले आहेत. त्यामुळे त्यांनी पाळत ठेवली असावी. असं नाना पटोले यांच्या वक्तव्यातून आम्हाला वाटतंय.' अशी प्रतिक्रिया दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला.

अधिक वाचा :

स्वबळाचा नारा देत महाविकास आघाडीला मोठा धक्का देणारे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केले होते. त्यानंतर त्यांनी लोणावळ्यातल्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत. असा खळबळजनक आरोप केला.

'आयबीच्या मदतीनं आपल्या हालचालींवर नजर ठेवली जात असल्याचा दावा पटोलेंनी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना केला. पटोलेंच्या या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

अधिक वाचा :

यावर बोलतानाच फडणवीस म्हणाले की, 'नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देताच त्यांच्यावर पाळत ठेवायची गरज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना का भासत आहे? याचा उत्तर तेच देऊ शकतात.'

हे ही वाचलं का?

पाहा फोटो : हिंगोली येथील ओढ्यात आई आणि मुलगी वाहून गेली

[visual_portfolio id="5676"]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT