संग्रहित छायाचित्र  
विदर्भ

उमरखेड : आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार

स्वालिया न. शिकलगार

उमरखेड; पुढारी वृत्तसेवा : आमिष दाखवून पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या प्रकरणात रात्री उशीरा पोलिस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. ६८ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली.

याबाबत पोलीस सूत्राकडून माहिती मिळाली. संशयित आरोपी शिवराम पुनाजी मात्रे (वय ६८ वर्ष) याने सदर मुलीला ५ रुपयाचे आमिष दाखवले. गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. ही घटना गावातील दोन व्यक्तींनी पाहिली.

याबाबत रात्री उमरखेड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी ३७६ , ३७६ अ / ब व पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद केला असून, आरोपीला अटक केली आहे.

तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजाता बनसोड करीत आहेत.

हेही वाचलं का ? 

पाहा व्हिडिओ-वाद्य बनविणारे मोहम्मद मुस्तफा…| Musical Instruments are made in Pune

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT