परमबीर सिंग यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गोरेगाव पोलीस ठाण्यात आणखी एका वसुली प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे.
परमबीर सिंग यांच्यासोबत सचिन वाझे, सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी हे या गुन्ह्यात सह आरोपी आहेत.
गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांचे भागीदारीमध्ये बोहो रेस्टोरेंट बार आणि बीसीबी रेस्टोरेंट अॅन्ड बार आहे.
सचिन वाझे हा अग्रवाल यांच्या कायम संपर्कात होता. वाझे याने मुंबई पोलीस दलात नियुक्ती झाल्यानंतर अग्रवाल यांना वसुलीसाठी त्रास देण्यास सुरुवात केली.
त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने जानेवारी 2020 ते मार्च 2021 मध्ये अग्रवाल यांच्याकडून तब्ब्ल 09 लाख रुपये आणि 02 लाख 91 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाइल हप्ता म्हणून घेतले असे अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
दर दिवसाला 2 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट
कोरोनामुळे वसुलीला फटका बसल्याने परमबीर सिंग यांनी आपल्याला दर दिवसाला 2 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले असल्याचे वाझे याने अग्रवाल यांना सांगत.
त्यांना हॉटेल्स, बार आणि बुकी यांची माहिती घेऊन देण्यास दबाव टाकला होता. अग्रवाल यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
पहा व्हिडिओ : पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपने राज्यभर खळबळ
https://youtu.be/StsVFW0XFyI