वर्धा; पुढारी वृत्तसेवा : वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सिंदी, पुलगाव, आष्टी या चारही कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीने झेंडा फडकवला. वर्धा, पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपला खातेही उघडता आले नाही. सिंदी आणि आष्टी बाजार समितीमध्ये भाजपला तीन जागा मिळाल्या. आष्टी येथे सत्ता पालट झाला, काँग्रेसने १५ जागा मिळवत मुसंडी मारल्याने भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. चार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान प्रक्रिया शुक्रवारी (दि. २८) पार पडली. मतदानानंतर काही वेळाने मतमोजणी झाली.
वर्धा, पुलगाव, सिंदी, आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीकरीता शुक्रवारी शांततेत मतदान झाले. मतदानानंतर काही वेळाने मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. येथे हमाल, मापारी गटात तीन उमेदवारांना समान मते मिळाली होती. यात एकाला विजयी घोषित करण्यात आले. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपला खातेही उघडता आले नाही. येथे भाजपचे खासदार रामदास तडस, काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. येथे भाजपचा सुफडासाफ झाला. देवळीत १८ उमेदवार महाविकास आघाडीचे विजयी ठरले. दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.
सिंदी (रेल्वे) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकालही जाहीर झालेत. सिंदी येथे महाविकास आघाडीला १५ जागांवर विजय मिळाला. येथे भाजपला तीन जागा मिळाल्या. वर्धा, पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपला खातेही उघडता आले नाही. आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली. येथे काँग्रेसला १५ जागांवर विजय मिळाला. आष्टी येथे याआधी भाजपची सत्ता होती. यावेळी मतदारांनी काँग्रेसला संधी दिली. भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या. भाजपला हा मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा :