यवतमाळमध्ये काँग्रेस-उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने १८ पैकी ११ जागा जिंकत समितीत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. येथे भाजपला चार जागांवर समाधान मानावे लागले, तर अपक्ष तीन जागांवर विजयी झाले. दिग्रसमध्ये माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने १८ पैकी १४ जागा जिंकत विजयी झेंडा फडकविला. येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट भाजपला अवघ्या चार जागा मिळाल्या. बाभूळगावमध्ये १८ पैकी १४ जागा जिंकत महाविकास आघाडीने सत्ता मिळविली आहे.