APMC Election : येवला बाजार समितीत भुजबळांची सत्ता | पुढारी

APMC Election : येवला बाजार समितीत भुजबळांची सत्ता

येवला (जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली. पहिल्या तासातच हमाल तोलारी गटामध्ये अपक्ष उमेदवार अर्जुन ढमाले यांनी भुजबळ गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे गोरख सुरासे यांचा पराभव केला. त्यानंतर व्यापारी गटामधून भुजबळांच्या शेतकरी विकास पॅनलचे नंदकिशोर अट्टल तर अपक्ष उमेदवार भरत समदडिया विजयी झाले.

ग्रामपंचायत गटामधून शिंदे- दराडे गटाच्या शेतकरी समर्थक पॅनलचे महेश काळे व भुजबळांच्या शेतकरी विकास पॅनलचे व शिवसेना नेते संभाजी पवार यांचे निकटवर्तीय बापू गायकवाड हे विजयी झाले. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गटांमध्ये शेतकरी विकास पॅनलचे सचिन आहेर यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवीत शेतकरी समर्थक पॅनलच्या झुंजारराव देशमुख यांचा पराभव केला, तर अनुसूचित जाती गटामध्ये भुजबळांच्या शेतकरी विकास पॅनलचे व शेतकरी संघटनेच्या संध्या पगारे यांनी विजय मिळवीत शेतकरी समर्थक पॅनलचे गुड्डू जावळे यांचा पराभव केला.

भटक्या विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्ग मधून भुजबळांच्या शेतकरी विकास पॅनलचे अन् शिवसेना नेते संभाजी पवार यांचे समर्थक कांतीलाल साळवे विजयी झाले आहे. महिला राखीव गटामधून शिंदे गटाच्या शेतकरी समर्थक पॅनलच्या उषाताई शिंदे व शेतकरी विकास पॅनलच्या लता गायकवाड ह्या विजयी झाल्या.

ओबीसी जागेसाठी झालेल्या लढतीमध्ये भुजबळांच्या शेतकरी विकास पॅनलचे वसंतराव पवार यांनी विजय मिळवत शेतकरी समर्थक पॅनलच्या आणि प्रहार संघटनेच्या हरिभाऊ महाजन यांचा पराभव केला.

सोसायटी गटामध्ये शेतकरी विकास पॅनल ने बहुतांश जागांवर कब्जा केला आहे.  या ठिकाणी शेतकरी समर्थक पॅनल एक जागा मिळू शकला तर एका जागेसाठी फेर मतमोजणी सुरू आहे.

Back to top button