अमरावती; पुढारी वृत्तसेवा : ढाब्यावर जेवण झाल्यानंतर रस्ता ओलांडत असताना दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू झाला. तर, अन्य दोघजण युवक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मध्य प्रदेशातील बैतूल जिल्हा मुख्यालयाजवळील बडोरा परिसरात रविवारी (८ मे) रात्री झाला आहे. भीषण अपघातात राहुल बेठेकर या महाराष्ट्रातील तरुणाचा नागपूरला नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. अन्य दोन तरुणही गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्या ओलांडताना की दुचाकीवरून जाताना हा अपघातात झाला आहे? यांची माहिती अद्याप मिळालेली नाही.
याबाबतची अधिक माहिती अशी की, रविवारी (दि. ८) रात्री राहुल बेठेकर हा मित्रांसोबत बैतूल बाजार रोडवर असलेल्या ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होता. रात्री १२.३० च्या सुमारास जेवण आटोपून राहुल राजू बेठेकर (वय २१, रा. चुरणी, महाराष्ट्र) हा युवक रस्ता ओलांडून अल्पावधीसाठी दुसऱ्या बाजूला जात होता. दरम्यान भरधाव वेगात आलेल्या मोटार सायकलने त्याला धडक दिली. यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच राहुलच्या कुटुंबीयांनी रात्री बैतूल गाठत उपचारासाठी नागपूरला नेण्यात आले. या दरम्यान तालूका मुलताई जवळपास त्यांचा मृत्यू झाल्याने येथेच त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. याचवेळी राहुलचा मित्र शुभम आणि विशाल या दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, हे दोघेजण राहुलसोबत होते का?, दुचाकीवरून जात होते का?, की अन्य काही अपघातात जखमी झाले आहेत का?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोघांनाही रात्रीच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहुल बेठेकर हा फोटोग्राफीचे काम करायचा. महाराष्ट्रातून तो फोटोग्राफीसाठी मध्य प्रदेशात गेला असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचलंत का?