नाशिक : राहुड घाटात दुचाकी अपघातात चालक ठार एक गंभीर | पुढारी

नाशिक : राहुड घाटात दुचाकी अपघातात चालक ठार एक गंभीर

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा : राहुड घाटाच्या उतारावर भरधाव दुचाकीवरील तरुणांचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकी संरक्षक पत्र्यावर आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार १५ फूट लांब घसरत गेल्याने चालक जागीच ठार झाला. तर पाठीमागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मालेगाव येथील मोहमद सऊद सिराज अहमद (१७) व अब्दुस स्मी शहेजाद अख्तर (१५) हे दोघे दुचाकी (एम. एच. ४१, बी. डी. ७४०९) चांदवडकडून मालेगावकडे जात होते. यावेळी मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात उतारावर मोहंमद अहमदचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी १५ फूट घसरत संरक्षण पट्ट्यावर जाऊन आदळली. या अपघातात अहमदला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर अब्दुल समी शहेजाद अख्तर यांच्या हाता-पायास मार लागला आहे. या अपघाताची माहिती मिळताच मंगरूळ टोलचे आपत्कालीन पथक, १०८ रुग्णवाहिका, पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ अपघातग्रस्तांना मदतकार्य केले. या प्रकरणी जखमींचे नातेवाईक मोमीन मलिक शहेजाद अहमद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दीपक मोरे करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button