Pimpri: 6.5 tonne waste collection in Plugathon campaign
पुणे
पिंपरी : प्लॉगेथॉन अभियानामध्ये 6.5 टन कचरा संकलन
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने चिंचवडच्या केएसबी चौक ते टाटा मोटर्स रस्त्यावर रविवारी (दि.7) प्लॉगेथॉन अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत टाटा मोटर्स कंपनी तसेच, बीव्हीजी इंडियाचे कर्मचारी सहभागी झाले होते. मोहिमेत 6.5 टन कचरा जमा करण्यात आला.
मोहिमेत सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे यांच्यासह टाटा मोटर्सचे व्ही. टी. पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक शांताराम माने, राजेंद्र उज्जैनवाल, आरोग्य निरीक्षक लक्ष्मण साळवे, वैभव कांचनगौडार, सचिन जाधव, शैलेश वाघमारे, विक्रम सौदाई व कर्मचारी सहभागी झाले होते.

