नाशिक : पतीला मारहाण का केली? अशी विचारणा करणाऱ्या विवाहितेचा विनयभंग | पुढारी

नाशिक : पतीला मारहाण का केली? अशी विचारणा करणाऱ्या विवाहितेचा विनयभंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पतीला मारहाण का केली ? अशी विचारणा करणाऱ्या विवाहितेचा एकाने विनयभंग केल्याची घटना पाथर्डी रोडवर घडली.

या प्रकरणी पीडितेने इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयित दिनेश पोरजे (रा. पोरजे मळा, पाथर्डी गाव) याच्याविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार शनिवारी (दि.७) रात्री ८ च्या सुमारास संशयित दिनेशने शिवीगाळ व मारहाण करीत विनयभंग केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button