मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस. file photo
नागपूर

Devendra Fadnavis| "मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले तरी विकास जमला नाही" : देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी

राज ठाकरेंनी मला मुंबईच्या बाहेरचं ठरवल्याने मी आता सर्टिफाईड नागपूरकर

पुढारी वृत्तसेवा

Devendra Fadnavis Interview

नागपूर: "मी नगरसेवक होईल किंवा राजकारणात इतका पुढे जाईन, असं कधीच वाटलं नव्हतं; पण नागपूरकरांच्या आशीर्वादामुळे मी आमदार आणि मुख्यमंत्री कधी झालो हे समजलंही नाही. आज जे लोक मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले, ते शहराचा विकास करू शकले नाहीत, ते आता काय विकास करणार?" अशा बोचऱ्या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. ८) विरोधकांचा समाचार घेतला.अभिनेता भारत गणेशपुरे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी नागपूरच्या विकासाचे मॉडेल आणि भविष्यातील योजनांवर सविस्तर भाष्य केले.

'मी आता सर्टिफाईड नागपूरकर'

राज ठाकरे यांच्या एका विधानाचा संदर्भ देत फडणवीस मिश्किलपणे म्हणाले की, "राज ठाकरेंनी मला मुंबईच्या बाहेरच ठरवल्यामुळे मी आता अधिकृतपणे 'सर्टिफाईड नागपूरकर' झालो आहे." आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी नागपूरच्या जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

७०० हेक्टरवर वसणार 'न्यू नागपूर'

नागपूरच्या भविष्याबद्दल घोषणा करताना फडणवीस म्हणाले की, "नवीन तंत्रज्ञान आणि व्यवसाय आकर्षित करण्यासाठी नवीन शहराची गरज आहे. म्हणूनच शहराजवळ आम्ही ७०० हेक्टर जमिनीवर 'न्यू नागपूर' तयार करणार आहोत. नवीन नागपूर आणि रिंग रोडसाठी तब्बल ११ हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत."

चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचं मॉडेल नागपूर

अभिनेता भारत गणेशपूरे आणि अभिनेत्री स्‍पृहा जोशी यांनी घेतलेल्‍या विशेष मुलाखतीवेळी मुख्‍यमंत्री फडणवीस म्‍हणाले की, मुंबईमध्ये सर्वाधिक नाव नितीन गडकरी यांच नाव घेतलं जातं त्यांनी 55 ब्रिज तयार केलेत. मुंबई पुण्यानंतर सर्वाधिक लोकसंख्येचा नागपुर शहर आहे. या शहरात भरपूर आधुनिकता आहे. नागपुरात सांडपाणी प्रक्रिया होते यामध्ये सांडपाणी मध्ये प्रक्रिया करून निर्मिती करून पैसा गमावणारा पहिला शहर झाले.चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचं मॉडेल नागपुर मध्ये तयार केले जात आहे. आजही येथे पाण्यासाठी मोर्चे निघत नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

दीक्षा भूमी होणार आंतरराष्ट्रीय स्थळ

नागपूर शहराची आळेख दीक्षाभूमीचे शहर अशीही आहे. हे स्थान पवित्र आणि ऐतिहासिक स्थान आहे. 1997 मध्ये मी महापौर असताना आणि नितीन गडकरी पालकमंत्री असताना दीक्षाभूमी येथील पाण्याची व अन्‍य गोष्टी केल्या. आता देखील 200 कोटी रुपये खर्चून दीक्षा भूमी आंतरराष्ट्रीय स्थळ व्हावे असं काम सुरू आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

पंचवीस हजार झोपडपट्टी धारकाना आम्ही मालकीचा पट्टा देतोय

मी मुख्यमंत्री झाल्यावर नागपुरात झोपडपट्टीमध्ये पट्टे वाटपाचा काम सुरू केलं. सुरुवातीला काही अडचणी आल्या. पुन्हा काही जीआर मध्ये बदल करून आता किमान पंचवीस हजार झोपडपट्टी धारकाना आम्ही मालकीचा पट्टा देतोय. आता नागपूर पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात लागू करत झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना त्यांची मालकी आम्ही देत आहोत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

"समृद्धी महामार्ग केवळ नागपूरसाठी नाही"

मला किंवा नितीन गडकरी साहेबांना संधी मिळाली, तेव्हा आम्ही नागपूरला डोळ्यासमोर ठेवले हे खरे आहे, पण इतर शहरांकडे दुर्लक्ष केले नाही. मुंबईचे बदललेले स्वरूप असो किंवा पुणे आणि संभाजीनगरचा विकास, हे सर्व आमच्या काळातच झाले. समृद्धी महामार्गाचा फायदा केवळ नागपूरला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील व्यवसायांना होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT