विदर्भ

बलात्कार करायचा असेल, तर वारांगनाच्या वस्तीत या : ज्वाला धोटे

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी ८ महिन्यांपूर्वी वारांगणांची वस्ती गंगा जमुनावर कारवाई केली. तेव्हापासून ही वस्ती बंद आहे. परिणामी नागपुरात बलात्काराच्या घटना वाढल्या, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटे (Jwala Dhote) यांनी आज नागपुरात केले. तसेच बलात्कार करणाऱ्या नराधमांना बलात्कार करायचा असेल, तर वारांगनाच्या वस्तीत या, पण सुसंस्कृत महिलांवर अत्याचार करू नका असेही वक्तव्य वारंगणाच्या आंदोलनाच्या नेतृत्व करणाऱ्या ज्वाला धोटे यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त धोटे (Jwala Dhote) यांनी आज नागपुरातील आजमशहा चौकातून रॅली काढली, त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. आज जागतिक महिला दिन देशभरात साजरा होत असताना नागपुरातील गंगा जमुना (रेड लाईट) परिसरातील महिलांनी काळा दिवस पाळत पोलीस प्रशासनाच्या कारवाईचा निषेध केला. नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी ८ महिन्यांपूर्वी वारांगणांची वस्ती गंगा जमुनावर कारवाई केली. तेव्हापासून ही वस्ती बंद आहे. परिणामी नागपुरात बलात्काराच्या घटना वाढल्या.

मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत आणि आमच्याच पक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहमंत्री आहेत. तरीही आम्हाला या राज्याच्या उपराजधानीत न्याय मिळत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. महाविकास आघाडी, नागपूरचे पालकमंत्री, राज्याचे गृहमंत्री आणि नागपुरातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आज आम्ही जाहीर निषेध करीत आहोत, असे धोटे म्हणाल्या.

दरम्यान, सुसंस्कृत माता, बहिणींवर वाईट नजर टाकू नका, तुमची भूक भागवायची असेल, तर आमच्याकडे या, असे आवाहन गंगा जमुना वस्तीतील वारांगनांनी नराधमांना केले आहे. या वारांगना वस्तीतील देह व्यापारावर बंदी घालत विविध प्रकरणात कारवाई करत गुन्हे दाखल केल्या जात आहे. यामुळे मागील आठ महिन्यांपासून पोलीस प्रशासनाच्या कारवाईमुळे व्यवसाय बंद पडल्याने वाद पेटलेला आहे. यात जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला ६० वर्षीय महिलेवर तडीपारीची कारवाई केल्याने निषेध व्यक्त कारण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे.

यासाठी मानवी शृंखला तयार करून रस्ता रोको करून पोलीस प्रशासनाचा कारवाईचा निषेध केला. वारांगना गंगा जमुना वस्तीत अल्पवयीन मुलींकडून जबरदस्तीने देहव्यापार करून घेतला जात असल्याचा आरोप ठेवत तसेच स्थानिक नागरिकांच्या तक्रारीमुळे अनेक कुंटणखान्यांवर बंदी घातली आहे. सुमारे आठ महिन्यांपासून या गंगा जमुना वस्ती परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामुळे या वस्तीकडे कोणीच फिरकत नसल्याने त्यांचा व्यवसाय बंद पडला आहे.

हेही वाचलंत का ?

पहा व्हिडिओ : "स्त्री हे शक्तीचं रूप" – अमृता फडणवीस | Power Women | International Women's Day 2022

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT