Nashik Mumbai highway Accident Pudhari
ठाणे

Nashik Mumbai highway Accident: नाशिक–मुंबई महामार्गावर काळाचा घाव; अज्ञात वाहनाच्या धडकेत साई पदयात्री तरुणाचा मृत्यू

खर्डीजवळ भरधाव कारने पदयात्रेत घुसून ५ साई भक्तांना उडवले; एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर

पुढारी वृत्तसेवा

कसारा: शाम धुमाळ

नाशिक–मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०३ वर शहापूर तालुक्यातील चेरपोली गावाजवळील कॅनल ब्रिज परिसरात शुक्रवारी (दि. १६ जानेवारी) सकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने साई पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याने साई भक्त तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

वैभव गोपाळ मलिक उर्फ सोन्या (वय २६), रा. साई दर्शन सोसायटी, वडाळा, अँटॉप हिल, मुंबई असे मृत तरुणाचे नाव असून . वैभव हा यंग बॉईज स्पोर्ट्स क्लब, अँटॉप हिल यांचा सदस्य असून, सायन (मुंबई) येथून शिर्डीकडे पालखी सोहळ्यासाठी पायी प्रवास करत होता. आसनगाव रेल्वे स्थानक येथे मुक्काम केल्यानंतर सकाळी तो इतर सदस्यांसह महामार्ग ओलांडत असताना हा अपघात घडला.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र, चेरपोली (शहापूर) येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक छाया कांबळे, तसेच पोलीस हवालदार आवटे, सांगळे, पानसरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेतील वैभव यास खाजगी रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय, शहापूर येथे दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तात्काळ वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सदर अपघात शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत. अपघातास कारणीभूत असलेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे..

खर्डी जवळ भरधाव कार ने साई भक्तांना उडवले. 2 गंभीर जखमी 3 किरकोळ जखमी.

आज सकाळी साई भक्ताचा आपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असतानाच दुपारी 3 वाजेच्या सुमारास खर्डी जवळील ललित कंपनी जवळ एक दुर्दैवी आपघात झाला ठाणे तें शिर्डी पायी पदयात्री जाणारे साई

भक्त खर्डी सोडून पुढे मुंबई नाशिक मार्गांवरून शिर्डी च्या दिशेने जात असता अचानक एक भरधाव कार मुंबई च्या दिशेने जात असता कार चालकाचे नियंत्रण सुटले व कार साई भक्ताच्या पदयात्रेत घुसली त्यात कार चालकाने ५ साई भक्तांना उडवले अचानक च्या या अपघाता मूळे पदयात्रेत गोंधळ उडाला मात्र कार च्या धडकेमुळे 5 साई भक्त जखमी झाले त्यात स्वप्नील साळूंखे हा उपचारादरम्यान मयत झाला तर अन्य एक जनाची प्रकृती गंभीर असून 2 जण फॅक्चर आहेत तर एक जण किरकोळ जखमी आहे घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम चे सदस्य किशोर घरत, मयूर घरत, रुपेश भवारी, सुनील करवर यांनी महामार्ग पोलिसांच्या मदतीने जखमीना खर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करीत तिथे प्रथमोपचार करून सर्व जखमी ठाणे येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.आहेत.केशव खाडे, हर्ष गायकवाड, स्वप्नील साळुंखे(,मयत )युवराज गोंधळी असे गंभीर दुखापत झालेल्या साई भक्तांचे नाव असून एका किरकोळ जखमी साई भक्ताचे नाव अद्याप समजले नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT