ठाणे

डोंबिवलीतील गॅस सिलेंडर स्फोट प्रकरण, सहा दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या वृद्धेचा अंत

backup backup

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : पश्चिम डोंबिवलीकडील गायकवाडी येथील पारसनाथ इमारतीमध्ये मंगळवारी (दि. २३ ऑगस्ट) गॅसचा स्फोट होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना घडली होती. जखमींपैकी ज्या घरात स्फोट झाला त्या घरातील होरपळलेल्या वृद्धेचा मृत्यूशी झुंज देत उपचारादरम्यान सहा दिवसानंतर सोमवारी सकाळी मृत्यू झाला. मनीषा माणिक मोर्वेकर (वय ६०) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. याचे वृत्त कळताच ही वृद्धा राहत असलेल्या सोसायटी व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मंगळवारी 23 तारखेला सायंकाळी साडेसातच्या सुमारास पारसनाथ सोसायटीच्या तळमजल्यावर राहणाऱ्या मनीषा मोर्वेकर यांच्या घरात सिलेंडरमधून झालेल्या गळतीने स्फोट झाला होता. या स्फोटात घरातील मनीषा मार्वेकर यांच्यासह त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या ४० वर्षीय उरसुला लोढाया आणि त्यांचा ५ वर्षीय मुलगा रियांश असे 3 जण गंभीर जखमी झाले होते.

मात्र, डोंबिवलीच्या निवासी विभागातील एका खासगी रुग्णालयात तब्बल ६ दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या मनीषा यांनी सोमवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. तर मुलगा रियांश आणि त्याची आई उरसिला हे दोघेही माय-लेक गंभीर जखमी झाले होते. सध्या हे माय-लेक खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या दोघांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालय व्यवस्थापने सांगितले. गॅस गळती होऊन हा स्फोट झाल्याची माहिती याच मार्वेकर आजींनी त्यांच्या जबानीत स्थानिक विष्णूनगर पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी गॅस कंपनीचे पत्रव्यवहाराद्वारे लक्ष वेधले असून कंपनीने देखील त्याला प्रतिसाद दिला आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सध्या पोलिसांसह गॅस कंपनीकडून चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT