Team India in Dubai : टीम इंडियाचा दुबईतील ‘या’ हॉटेलमध्‍ये मुक्‍काम, दिवसाचे भाडे ऐकून व्‍हाल आवाक! | पुढारी

Team India in Dubai : टीम इंडियाचा दुबईतील 'या' हॉटेलमध्‍ये मुक्‍काम, दिवसाचे भाडे ऐकून व्‍हाल आवाक!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टीम इंडियाने आशिया चषक स्‍पर्धेत रविवारी पहिल्‍याच सामन्‍यात दिमाखदार कामगिरी करत कट्टर प्रतिस्‍पर्धी पाकिस्‍तानचा पराभव केला. मागील वर्षी दुबईत झालेल्‍या टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेत पाकिस्‍तानने भारताचा पराभव केला होता. टीम इंडियाने १० महिन्‍यांपूर्वी झालेल्‍या पराभवाचा बदला घेतला. या स्‍पर्धेसाठी भारतीय संघ २२ ऑगस्‍ट रोजी दुबईत पोहचला होता. (Team India in Dubai ) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) टीम इंडियातील खेळाडूची राहण्‍याची व्‍यवस्‍था केलेल्‍या दुबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये केली आहे.  जाणून घेवूया या हॅाटेलचे दिवसाचे भाडे किती आहे याविषयी…

Team India in Dubai : जगातील सर्वोत्‍कृष्‍ट हाॅटेलपैकी एक

दुबईतील प्रसिद्ध पाम जुमेरा रिसॉर्ट या हॉटेलमध्‍ये टीम इंडियाचा मुक्‍काम आहे.आयपीएल २०२२ च्‍या सीझनमध्‍ये चेन्‍नई सुपरकिंग्‍ज टीमने येथे मुक्‍काम केला होता. जगातील अलिशान हॉटेलपैकी एक अशी पाम जुमेरा रिसॉर्टची ओळख आहे. या हॉटेलच्‍या पहिल्‍या मजल्‍यावर टीम इंडियाच्‍या राहण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. या हॉटेलच्‍या खिडकीतून दुबईतील भव्‍य इमारतींचे दर्शन होते. तसेच हॉटेलमध्‍ये भव्य शॉपिंग सेटर, मोठा स्‍वीमिंग पूल, थ्री डी आणि फोर डी थिएटरची सुविधा आहे. जगातील सर्वोत्‍कृष्‍ट हाॅटेलपैकी एक अशी या हॅाटेलची ओळख आहे.

पाम जुमेरा या हॉटेलमध्‍ये एका व्‍यक्‍तीचा दिवसाचा राहण्‍याचा खर्च सुमारे ३० ते ४० हजार रुपये एवढा आहे. टीम इडियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्‍टाफ असे सुमारे ३० जण या हॉटेलमध्‍ये मुक्कामी असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) या हॉटेलसाठी दररोज ९ ते १० लाख रुपये खर्च करत आहे. विशेष म्‍हणजे हे केवळ राहण्‍याचे भाडे आहे अन्‍य सुविधा आणि जेवणाचा खर्च वेगळा आहे.

हेही वाचा :

 

 

 

 

Back to top button