ठाणे

ठाणे : महिलांच्या दागिन्यांवर डल्‍ला मारणारे दोघे गजाआड; १५ लाखांचा ऐवज जप्त

निलेश पोतदार

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा महिलांचे दागिने चोरणार्‍या दोघा सराईत चाेरट्यांना मानपाडा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. एका आरोपीने पालघर आणि ठाणे जिल्ह्यात एकूण २९ गुन्हे केल्याची नोंद असून, कल्याण परिक्षेत्रात केलेले एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. या दोघांकडून एकूण १५ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

मूळचे राजस्थान येथील रहिवासी असणारे आणि सध्या भिवंडी स्थित रमेश पालीवाल (वय 34) आणि महेश जठ (35) अशी चाेरट्यांची नावे आहेत. या चाेरट्यांमुळे कल्याण डोंबिवली परिसरातील महिलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. आरोपींना अटक करण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते. सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विविध पोलिस पथके स्थापन करण्यात आली.

मानपाडा पोलीस ठाण्याकडून तयार करण्यात आलेल्या पथकाने मानपाडा रामनगर, विष्णूनगर, टिळक नगर, खडकपाडा, कोळशेवाडी, महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चेन स्नॅचिंगच्या घटना, त्यांच्या वेळा, आरोपीच्या येण्याजाण्याच्या वेळा यांचा अभ्यास करून सीसीटीव्ही द्वारे आरोपींच्या शेवटच्या लोकेशनची पाहणी केली. त्याद्वारे कल्याण-डोंबिवली परिसरात येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात आले.

संशय बळवल्याने पोलिसांनी महेश आणि रमेश या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्‍या दाखवताच या दोघांनी जवळपास नऊ गुन्ह्यांची कबुली दिली. दरम्यान पोलिसांनी एकूण १५ लाख २५ हजार रुपयांचे ३०५ ग्रॅम वजनाचे सोन्‍याचेे दागिने, एक दुचाकी सा १५ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. यावेळी विष्णुनगर पोलिस ठाणे हद्दीतील एकूण पाच, मानपाडा, टिळक नगर, खडकपाडा, कोळसेवाडी हद्दीतील प्रत्येकी एक असे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस सहाय्यक आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे, मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी हे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

हे ही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT