नारायणगावचे टोमॅटो खाताहेत भाव……. | पुढारी

नारायणगावचे टोमॅटो खाताहेत भाव.......

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

नारायणगाव ही टोमॅटोची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. या परिसरात टोमॅटो मोठ्या प्रमाणात येतात. उन्हाळा कडक असल्याने उत्पादनात घट झाली असली तरी टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे  होत आहे.

पुणे जिल्हा बँकेत लवकरच 800 जागांची भरती; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

नारायणगाव येथे जुन्नर, आंबेगाव, संगमनेर, बारामती, शिरूर, श्रोगोंदा भागातून मोठ्या प्रमाणात टोमॅटो विक्रीसाठी येतो. खराब वातावरणामुळे इतर भागातील टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्याने नारायणगाव भागातील टोमॅटोला मागणी आहे.

औरंगाबाद : शिवारात ट्रक उलटला, नागरिकांची टोमॅटोसाठी झुंबड

उन्हाची तीव्रता जास्त असल्याने भाज्यांच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होती. परंतु टोमॅटोची आवकमध्ये सातत्य असल्याने टोमॅटोला भाव मिळत आहे. अनेक ठिकाणी उन्हाळी हंगामात टोमॅटो काढला गेला आहे. सध्या इतर राज्यात टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्याने इतर राज्यात नारायणगाव टोमॅटोला मागणी आहे. पिंपरी बाजारात नारायण गाव टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. एका क्रेटला 900 ते 1000 रुपये भाव मिळत आहे.

टोमॅटो प्रकार

गजरा
अंगठी
आरएएफ
रोमण

गेल्या दोन वर्षांपासून टोमॅटोला मागणी कमी होती. या वर्षी टोमॅटोला मागणी जास्त आहे. नारायणगाव येथील टोमॅटोची गुणवत्ता चांगली असते. काहीसे कडक असले तरी आतून रस असतो. त्यामुळे नारायण गावातील टोमॅटो परदेशातही जातात.

                                                                   -प्रतीक बोराटे,

                                                                         व्यापारी

Back to top button