ठाणे

कल्याणमध्ये भरदिवसा कॉन्ट्रॅक्टरवर प्राणघातक हल्ला

अविनाश सुतार

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली परिसरात भरदिवसा बिपिन मिश्रा या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरवर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. ही घटना आज (रविवार) सकाळी खडेगोळवलीतील एका पान सेंटरसमोर घडली. या हल्ल्यात बिपिन मिश्रा जबर जखमी झाले आहेत. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर बिपिन मिश्रा हे आपल्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी खडेगोळवलीतील पाण्याच्या टाकीजवळ दबा धरून बसलेल्या सशस्त्र हल्लेखोरांनी दुचाकी अडवून धारदार शस्त्राने मिश्रा यांच्या छाती, बरगड्या, पोट, हातावर सपासप वार केले.

अचानक झालेल्या हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत मिश्रा रत्यावर आडवे पडले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमू लागताच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. जखमी अवस्थेत पडलेल्या मिश्रा यांना लोकांनी उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्या जबानीवरून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद केलेल्या हल्लेखोरांच्या वर्णनानुसार पोलिसांची पथके फरार हल्लेखोरांना शोधण्यासाठी रवाना झाली आहेत. मात्र, या हल्ल्यामागचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : चला दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा ऐकूया : महिमा श्री केदारलिंगाचा…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT