vairag nagarpanchayat  
सोलापूर

सोलापूर : वैराग नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

स्वालिया न. शिकलगार

वैराग (सोलापूर) : पुढारी वृत्तसेवा

वैराग नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निरंजन भूमकर यांच्या नेतृत्वाखाली १३ जागा जिंकल्या. राष्ट्रवादीने पूर्ण बहुमत प्राप्त केले असून भारतीय जनता पक्षाला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर शिवसेना काँग्रेस आघाडीला आपले खाते उघडता आले नाही.

वैराग नगरपंचायतच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निरंजन भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस १७ जागेवर आपले उमेदवार उभे केले होते. भाजपचे सहयोगी सदस्य आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे १७ जागेवर उमेदवार उभे केले होते. शिवसेना आणि काँग्रेस आघाडी यांनी मिळून १५ जागेवर उमेदवार उभे केले होते. तर दोन अपक्षाला पुरस्कृत केले होते.

प्रभाग क्रमांक १ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल अशोक मोहिते ३४८ मते घेऊन विजयी झाले. याच प्रभागातून भारतीय जनता पक्षाचे मधुकर कापसे व शिवसेनेचे अरुण सामंत हे पराभूत झाले. प्रभाग क्रमांक २ मधून बार्शी तालुका पंचायत समिती सदस्य तथा उमेदवार निरंजन प्रकाश भूमकर राष्ट्रवादी काँग्रेस ३६२ मते मिळवून विजयी झाले.

अपक्ष विकास मगर व भाजपचे दत्तात्रय क्षीरसागर हे पराभूत झाले. प्रभाग क्रमांक-३ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तृप्ती निरंजन भूमकर ६८४ मते घेऊन विजयी झाल्या. भाजपच्या जाहिरा शेख व शिवसेनेच्या मुमताज शेख पराभूत झाल्या . प्रभाग क्रमांक चारमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुप्रिया आनंद घोटकर या २३९ मते घेऊन विजयी झाल्या.

भाजपच्या शोभा पाचभाई व शिवसेनेच्या कविता सोपल या पराभूत झाल्या. प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुरु बाई संजय झाडमुखे या ३९६ मते घेऊन विजयी झाल्या. माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना-काँग्रेसच्या उमेदवार तेजस्विनी मरोड व भाजपच्या रेश्मा शिंदे या पराभूत झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक ६ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आसमान नयुम मिर्झा यात ३३८ मध्ये घेऊन विजयी झाल्या.

भाजपच्या मनीषा तावस्कर व काँग्रेसच्या मुमताज पठाण या पराभूत झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक ७ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदमीन अप्पाराव सुरवसे या २२४ मते घेऊन विजयी झाल्या. तर भाजपच्या साधना गांधी व शिवसेनेच्या कुसुम वरदाने या पराभूत झाल्या. प्रभाग क्रमांक ८ मधून भाजपच्या राणी वैजिनाथ आदमाने या ३९३ मते घेऊन विजय झाल्या. तर राष्ट्रवादीच्या कविता खेदाड व माजी जिल्हा परिषद सदस्य मकरंद निंबाळकर यांच्या पत्नी तथा अपक्ष उमेदवार सुप्रिया निंबाळकर या पराभूत झाल्या.

प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जैतुनबी गफूर बागवान या ३७० मते घेऊन विजयी झाल्या आहेत तर माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे उमेदवार मकरंद निंबाळकर व भाजपाचे दीपक माने हे पराभूत झाले आहेत. प्रभाग क्रमांक १० मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नागनाथ वाघ ४२४ मते घेऊन विजयी झाले. या प्रभागातून भाजपाचे आप्पासो खेंदाड व शिवसेनेचे सतीश खेंदाड हे पराभूत झाले. प्रभाग क्रमांक ११ मधून भाजपचे श्रीशैल्य मच्छिंद्र भालशंकर हे २१९ मते घेऊन विजयी झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेश्मा ठोंबरे व शिवसेनेचे आकाश काळे हे पराभूत झाले आहे. प्रभाग क्रमांक १२ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्षय विठ्ठल साठे हे ३१८ मध्ये घेऊन विजयी झाले. भाजपचे दिलीप गांधी व शिवसेनेचे दादासाहेब मोरे हे पराभूत झाले आहेत. प्रभाग क्रमांक १३ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार तथा माजी सरपंच सुजता संगमेश्वर डोळसे या २८५ मते घेऊन विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या रसिका लोंढे व शिवसेनेच्या संध्याराणी आहिरे या पराभूत झाल्या आहेत.

प्रभाग क्रमांक १४ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजयकुमार शिवाजी काळोखे हे १७८ मध्ये घेऊन विजयी झाले आहेत तर भाजपचे विनोद चव्हाण व शिवसेनेचे किशोर देशमुख ते पराभूत झाले आहेत. प्रभाग क्रमांक १५ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री खंडेराया घोडके या ३४७ मते घेऊन विजयी झाल्या. शिवसेनेच्या शोभा पांढरमिसे व भाजपच्या जयश्री सातपुते या पराभूत झाल्या आहेत.

प्रभाग क्रमांक १६ मधून भाजपच्या अर्चना बाबासाहेब माने – रेडी या २८६ मते घेऊन विजयी झाल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा मगर व शिवसेनेच्या शुभांगी पांढरमिसे या पराभूत झाले आहेत. प्रभाग क्रमांक १७ मधून माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष निंबाळकर यांचे चिरंजीव भाजपचे शाहूराजे संतोष निंबाळकर हे ३३३ मते घेऊन विजयी झाले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विनायक खेंदाड व शिवसेनेचे रवींद्र पवार हे पराभूत झाले आहेत .

* जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितीचे माजी सभापती मकरंद निंबाळकर व त्यांच्या पत्नी सुप्रिया निंबाळकर दोघेही पराभूत

* माजी तालुका पंचायत सदस्य निरंजन भूमकर व त्यांच्या पत्नी तृप्ती भुमकर दोघेही विजयी

* माजी जिल्हा परिषद सदस्य तेजस्वीनी मरोड पराभूत

* साम-दाम-दंड-भेद याला फाटा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन भूमकर यांची वैराग नगरपंचायत वर एक हाती सत्ता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT