अरे बापरे...! आणखी एका तरुणाचा खून   | पुढारी

अरे बापरे...! आणखी एका तरुणाचा खून  

मावळ तालुक्यातील सांगावडे येथील घटना

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुळवेवस्ती, भोसरी येथे एका अनोळखी तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.

गोव्यात आपच्या मुख्यमंत्रीपदाचा दावेदार ठरला, केजरीवालांना केली घोषणा

सोमवारी (दि. १७) रात्री ही घटना उघडकीस आली. हा प्रकार ताजा असताना आज मावळ तालुक्यातील सांगावडे येथे आणखी एका पंचवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.

विटा : खानापूर नगरपंचायतमध्‍ये सुहास शिंदे यांची सत्ता कायम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील सांगावडे गावच्या हद्दीत एका पडक्या खोलीमध्ये पंचवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह पडल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, फलंदाजीचा निर्णय

त्यावेळी पोलिसांना मृताच्या अंगावर खरचटल्याच्या खुणा दिसून आल्या. तसेच, बाजूच्या रस्त्यावरील मातीवर फरफटल्याचे निशाण दिसून आले.

सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या बाजुने मतदारांचा कौल

त्यामुळे आरोपींनी तरुणाचा खून केल्यानंतर  मृतदेह सांगावडे गावात फेकून दिला असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शिरगाव पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button