सातारा : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेने चालू आर्थिक वर्षातील रोजगार हमी योजनेचा 180 कोटी 54 लाख 33 हजार रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली आहे. या आराखड्यात शेततळी, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, सिंचन विहीर, पाझर तलाव दुरुस्ती, अंगणवाडी बांधकाम, गोटा, गांडूळ खत अशी एकूण 35 हजार 291 कामे प्रस्तावित केली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या हाताला काम मिळणार आहे.
जिल्ह्यात रोजगार हमी योजना राबवण्यात येत आहे. या योजने अंतर्गत पुढील वर्षातील कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी 180 कोटी 54 लाख 33 हजारांचा आराखडा तयार केला आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेत आराखडा मंजूर करुन त्यानंतर पंचायत समितीकडे पाठवण्यात आला होता.पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव घेऊन या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्याचा एकत्रित आराखडा तयार करुन तो जिल्हा परिषदेस सादर करण्यात आला.त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या आराखड्यास मंजुरी देण्यात आली.
जावली तालुक्यातील 2 हजार 861 कामांसाठी 81 हजार 969 मनुष्यबळ लागणार असून त्यासाठी 5 कोटी 80 लाख 79 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. कराड तालुक्यातील 7 हजार 144 कामांसाठी 3 लाख 70 हजार 524 मनुष्यबळ लागणार असून त्यासाठी 47 कोटी 19 लाख 21 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
खंडाळा तालुक्यातील 772 कामांसाठी 92 हजार 470 मनुष्यबळ लागणार असून त्यासाठी 6 कोटी 55 लाख 22 हजार रुपये खर्च अपेक्षीत आहे. खटाव तालुक्यातील 4 हजार 914 कामांसाठी 2 लाख 60 हजार 973 मनुष्यबळ लागणार असून त्यासाठी 21 कोटी 57 लाख 36हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. कोरेगाव तालुक्यातील 2 हजार 390 कामांसाठी 1 लाख 88 हजार 89 मनुष्यबळ लागणार असून त्यासाठी 15 कोटी 55 लाख 8 हजार रुपये खर्च अपेक्षीत आहे. महाबळेश्वर तालुक्यातील 2 हजार 415 कामांसाठी 76 हजार 229 मनुष्यबळ लागणार असून त्यासाठी 7 कोटी 5 लाख 13 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
माण तालुक्यातील 2 हजार 772 कामांसाठी 2 लाख 27 हजार 40 मनुष्यबळ लागणार असून त्यासाठी 18 कोटी 76 लाख 86 हजार रुपये खर्च अपेक्षीत आहे. पाटण तालुक्यातील 2 हजार 441 कामांसाठी 1 लाख 84 हजार 584 मनुष्यबळ लागणार असून त्यासाठी 11 कोटी 5 लाख 53 हजार रुपये खर्च अपेक्षीत आहे. फलटण तालुक्यातील 4 हजार 624 कामांसाठी 3 लाख 32 हजार 427 मनुष्यबळ लागणार असून त्यासाठी 27 कोटी 48 लाख 3 हजार रुपये खर्च अपेक्षीत आहे. सातारा तालुक्यातील 3 हजार 248 कामांसाठी 1 लाख 96 हजार 908 मनुष्यबळ लागणार असून त्यासाठी 16 कोटी 27 लाख 77 हजार रुपये खर्च अपेक्षीत आहे. वाई तालुक्यातील 1 हजार 710 कामांसाठी 90 हजार 167 मनुष्यबळ लागणार असून त्यासाठी 3 कोटी 22 लाख 63 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.