मिरज : मिरजेत नाला मुजवून पाडले प्लॉट | पुढारी

मिरज : मिरजेत नाला मुजवून पाडले प्लॉट

मिरज पुढारी वृत्तसेवा : येथील ख्वाजा वसाहतीत नैसर्गिक नाला मुजवून प्लॉट पाडल्याचा प्रकार कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे. बफर झोन असतानाही महापालिका आणि महसूल प्रशासनाने येथील प्रस्तावाला मंजुरी कशी दिली, असा सवाल करीत या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ख्वाजा वसाहत येथे 20 फुटी नैसर्गिक नाला आहे. या नाल्यातून झारीबाग, शिवाजीनगर, रेल्वेस्थानक परिसर, समतानागर, मणिकनगर, गंगानगर या भागातील सांडपाणी वाहतेे. शहरात थोडा देखील पाऊस पडला तर या नाल्याशेजारील वसाहतीत पाणी शिरते. या 20 फूट रुंद नाल्याभोवती अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे हा नाला आता 10 फूट राहिला आहे.

काही दिवसांपासून या भागातील शेतजमिनीमध्ये केवळ दोन फुटी व्यासाची पाईपलाईन टाकून नाला पूर्णपणे मुजविला आहे. या भागातील रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतर बुधवारी शंकर परदेशी, श्रीकांत महाजन, राकेश तामगावे, अनिल देशपांडे यांनी ख्वाजा वसाहतीत पाहणी केली. त्यानंतर हा कारभार उघडकीस आला.

याबाबत महापालिका आणि महसूल विभागाकडे तक्रार करून संबंधित मिळकतदारांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

Back to top button