Holi Celebration : होळी खेळायची तर मोबाईलसाठी ही काळजी घ्या! | पुढारी

Holi Celebration : होळी खेळायची तर मोबाईलसाठी ही काळजी घ्या!

पुढारी ऑनलाईन : होळी (Holi Celebration) आणि रंगपंचमीचा सण म्हणजे रंगांचा खेळ! यावेळी पाण्यामुळे मोबाईल खराब होण्याचा धोका असतो. काही टिप्सचे पालन केल्यास तुमचे टेन्शन कमी होऊन मोबाईल खराब होण्यापासून वाचू शकतो!

1. होळी खेळताना मोबाईल भिजला, तर तो स्विच ऑफ करा. फोनमध्ये पाणी गेल्यास त्याचे सर्किट खराब होण्याची शक्यता असते.

2. मोबाईल स्विच ऑफ केल्यानंतर बॅटरी, सिम कार्ड, मेमरी कार्ड, अन्य पार्ट वेगळे करून ते कोरड्या टॉवेलवर ठेवा.

3. मोबाईलमध्ये इनबिल्ट बॅटरी असेल तर पॉवर बटन दाबून धरा.

4. फोनचे पार्ट सुकविण्यासाठी पेपर नॅपकिनचा वापर करणे सर्वात चांगला उपाय आहे. तसेच फोन पुसण्यासाठी कोरड्या टॉवेलचाही वापर केला जाऊ शकतो.

5. फोन टॉवेलने पुसल्यानंतर त्यातील पार्टस् कोरड्या तांदळात टाकून एका डब्यात ठेवा. तांदळाकडून या पार्टस्मधील पाणी वेगाने ओढून घेतले जाते.

6. फोन सुकवण्यासाठी त्याचे पार्टस् सिलिका जेल पॅकमध्येही ठेवले जाऊ शकते. कारण, या जेलमध्ये पाणी तत्काळ शोषूण घेण्याची क्षमता असते.

7. मोबाईल तांदळाचा डबा अथवा सिलिका पॅकमध्ये 24 तास ठेवा. फोन पूर्णपणे सुकल्यानंतरच तो ऑन करा. यानंतरही फोन सुरू न झाल्यास सर्व्हिस सेंटरमध्येच जावे लागेल.

‘या’ चुका करू नका! (Holi Celebration)

फोन ड्रायरने सुकवण्याचा प्रयत्न करून नका; कारण ड्रायरच्या गरम हवेमुळे मोबाईलचे सर्किट वितळण्याची भीती असते.
फोन भिजल्यानंतर तो पूर्णपणे स्विच ऑफ केल्यानंतर कोणतेही बटन दाबू नका, शार्टसर्किट होण्याचा धोका असतो.

Back to top button