सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सध्या राजकीय परिस्थिती उद्भवली यात आश्चर्य काहीच नसल्याने मोठा धक्का बसला नाही. दोन वर्षांपासून आमदारांमध्ये खदखद सुरू होती. शिवसेना व भाजप यांचे विरोधक हे राष्ट्रवादी व काँग्रेस आहे. सत्तेसाठी केलेली समीकरणे जुळणार नव्हती, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
महाराष्ट्रतील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तींच्या दिशेने आहे. या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे म्हणाले, केवळ सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र आले; पण त्यांचे विचार वेगळे असल्याने एकत्र ठेवण्यासाठी कसरत करावी लागते. हे पक्ष वेगवेगळ्या विचारांचे असल्याने फार काळ एकत्र राहत नाहीत. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
पक्षश्रेष्ठींवर भाष्य करणार नाही. पण त्यावेळी विचार करायला हवा होता की सरकार किती दिवस टिकणार. आमदारांना वेळ दिला जात नाही, काम होत नाही, अशी नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे महाविकास आघाडीचे समीकरण जुळणार नव्हते, असेही उदयनराजे भोसले म्हणाले.
हेही वाचलंत का?