सांगली

सांगलीत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद, तलवार, चाकू जप्त; तिघांना अटक, चौघे फरार

अनुराधा कोरवी

सांगली : पुढारी वृत्तसेवा : येथील वखारभागामध्ये ट्रक चालकावर हल्ला करून दरोडा टाकणारी सराईत आरोपींची टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून तलवार, मोबाईल, चाकू जप्त करण्यात आला. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली.

त्यामध्ये समर्थ भारत पवार (वय 21) अक्षय अनिल सूर्यवंशी (वय 22, दोघे रा. राजीव गांधीनगर, जुना बुधगाव रोड) प्रमोद लक्ष्मण माने (वय 22 रा. काकानगर, कर्नाळ रोड ) यांचा समावेश आहे. यामध्ये आणखी अनोळखी चौघेजण फरार आहेत.

पोलिसांनी सांगितले, येथील वखारभागामध्ये पार्किंग केलेल्या ट्रकमध्ये चालक झोपला असता या संशयितांनी तलवार, चाकू याचा धाक दाखवून मारहाण करून 18 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते. दरोडा टाकून निघून गेले.

पोलिस तपास करीत असताना हा प्रकार समर्थ पवार आणि त्याच्या साथीदारांनी मिळून केल्याचे उघड झाले. त्यांची माहिती घेऊन अटक करण्यात आली. त्यांनी वखारभाग येथील एका गॅरेजमधून चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरला असल्याचेही उघड झाले. त्याप्रमाणे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीस गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

संशयित हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी चोरी, खंडणी, गर्दी मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. संशयितांकडे अधिक चौकशी चालू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT