अत्यंत चुरस असलेल्या पतसंस्था गटातून भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक यांनी राष्ट्रवादीचे किरण लाड यांचा पराभव करत वादळात दिवा लावला आहे. राहुल महाडिक यांचा हा विजय वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर होण्यआधीपासूनच राहुल महाडिक यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. निवडणूक बिनविरोध होवो अगर निवडणूक लागो; मैदानातून माघार घ्यायची नाही याच इराद्याने ते पूर्ण तयारीनिशी निवडणूकीत उतरले होते.
सुरवातीपासून मतदारांशी असलेला संपर्क, कार्यकर्त्यांचे परीश्रम, भाजप पक्षाची ताकद यामुळे राहुल महाडिक यांचा विजय सुकर झाला.
सुरवातीला महाविकास आघाडीला एकतर्फी वाटणारी निवडणूक भाजप मधील काही दिग्गज उमदेवारांच्यामुळे चुरशीची बनली. राहुल महाडिक यांच्या उमेदवारीमुळे पतसंस्था गटात मोठी चुरस होती. अखेर किरण लाड यांचा पराभव करत त्यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.