Raigad forest fire pudhari photo
रायगड

Poladpur Forest Fire: पोलादपूरमध्ये वाढले वणव्यांचे प्रमाण; वनसंपदा धोक्यात

जनजागृतीचा अभाव आणि कायद्याची कमकुवत अंमलबजावणी; डोंगररांगांतील उपयुक्त झाडे-वेलींचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर : पोलादपूर तालुक्यात डोंगरात पेटणा-या वणव्यांमुळे येथील अनेक उपयुक्त वृक्षवेली नष्ट होऊ लागल्या आहेत.वणवा विरोधी कायदा असला तरी सक्षमपणे राबविला जात नसल्याने कायद्याचे भय नसल्याने गेल्या काही वर्षापासून वनव्याचे प्रकार वाढत आहेत तालुक्यातील गावगवात वणव्याचे परिणाम पटवून देणे व व जनजागृतीद्वारे वणवा कायदाबाबत माहिती देणे गरजेचे आहे तालुक्यातील वनसंपदा व औषधी झाडाची निगा राखायची असल्यास ग्रामस्थांनी तरुणांनी एकत्र येत वणवा विरोधी मोहीम आखणे गरजेचे आहे.

तालुक्यात प्रत्येक गावात मोठ्या उत्साहात देवाचे नामस्मरण,सप्ताह विविध कार्यक्रम साजरे होतात त्या तुन समाजप्रबोधनकार व समाजसेवक वणवा या विषयावर जनजागृती करणे गरजेचे बनले आहे.सध्या शिमगोत्सव सुरू आहे आणि प्रत्येक गावात विविध कार्यक्रम सुरू आहेत.भविष्याचा विचार करून या वणवा विषयावर व त्या नंतर होणारे दुष्परिणाम वर मंथन करणे गरजेचे बनले आहे.

कीर्तन हे आपल्याकडे खूप मोठं समाज प्रबोधनाचे व्यासपीठ आहे.त्याचा उपयोग पुढील काळात वणवा विषयावर काम करण्यासाठी कसा होईल याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे.पोलादपूर तालुक्याला लाभलेलं निसर्ग सौंदर्य हे फक्त जून,जुलै,ऑगस्टमधेच न बघता पूर्ण वर्षभर अनुभवायचं असेल आणि पुढील काळात पाण्याच्या समस्येवर काम करायचे,तापमान वाढ थांबवायची असेल,फळबाग खालील क्षेत्र वाढवून तालुक्यातून आर्थिक उलाढाल वाढवायची असेल किंवा एप्रिल मे महिन्यात जनावरांच्या पोटाची खळगी बघायची नसेल, जमिनीवरील सुपीक मातीचा थर टिकवायचा असेल,पावसात जमिनीची धूप थांबायची असेल तर वणवे थांबवणे खूप गरजेचे आहे. तालुक्यातील बहुतांश गावातून गैरसमजातून व चुकीच्या परंपरेतून हे वणवे पेटवले जात आहेत. गवताच्या चांगल्या

वाढीसाठी वणवे पेटवण्याचा गैरसमज येथील ग्रामीण भागात अनेक वर्षापासून आहे. मात्र, या कृतीला कुठलेही शास्त्रीय कारण स्पष्ट केले जात नाही.येथील शेतकरी भातपीक घेण्यासाठी तरवा तयार करतात. त्यासाठी गवत, पेंढा, कवळ, शेणाचा वापर केला जातो. कवळ तोडीचा फटकाही झाडांना बसत आहे. तसेच तरव्यासाठी वणवे पेटवले जात आहेत गेल्या काही वर्षांपासून वनव्याचे प्रकार वाढीस लागले आहे कोकणातील भूमीला सीतामाई चा शाप व उपशाप असल्याचे सांगितले जात असून सदरची भूमी जळो व पुन्हा बहोरो अशी आख्यायिका आजही ब्रूजुर्ग मंडळी

सांगत आहे. मात्र सातत्याने लावणाऱ्या वनव्याच्या भक्ष्यस्थानी वनसंपदा, झाडे, सरपटणारे प्राणी सापडत असल्याने सदरचे प्रकार थांबवावे या साठी वणवा विरोध कायदा अंमलात आणला गेला मात्र याची अंमलबजावणी हवी तशी झाली नसल्याने व कायद्याचे भय उरले नसल्याने वनव्याच्या प्रकारात वाढ होताना दिसून येत आहे 1927 च्या वणवा विरोधी कायद्या मध्ये बदल होत गेले आहेत सुधारित कायद्यात 2 वर्ष शिक्षा व 5 हजार रुपये दंड करण्यात आले आहेत.मात्र याची अंमलबजावणी होत नसल्याने वनव्याचे प्रकार वाढत आहे त्यातच अनेकदा गोठा,वाडा यांना त्याची झळ बसत लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शासनाने वानवा विरोधी कायद्या साठी स्थानिक पातळीवर जनजागृती सह कडक अंमलबजावणी करणे अनिवार्य ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT