Suraj Sarange Forest Guard: कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे वनरक्षकाचा मृत्यू; काशिद-चिकणी मार्गावरील खड्ड्यात दुचाकी कोसळली

अलिबाग वनविभागातील सुरज सारंगे यांचा दुर्दैवी अंत; सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप
Suraj Sarange Forest Guard
Suraj Sarange Forest GuardPudhari
Published on
Updated on

रेवदंडा : महेंद्र खैरे

नव्याने बांधण्यात येत असलेल्या मोरीच्या खड्ड्यात दुचाकी कोसळून अलिबाग वनविभागातील तरुण वनरक्षक सुरज सारंगे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मुरुड तालुक्यातील काशिद-चिकणी मुख्य रस्त्यावर काल रात्री १०:३० च्या सुमारास ही घटना घडली. कंत्राटदाराने कामाच्या ठिकाणी सुरक्षेचे कोणतेही निकष न पाळल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करत वनरक्षक संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Suraj Sarange Forest Guard
Matsya Sampada Yojana: मत्स्य व्यवसायाला अर्थसंकल्पात मोठा दिलासा; ‘मत्स्यसंपदा’ योजनेसाठी 1,200 कोटींची तरतूद

आनंदावर विरजण: जुळ्या मुलांच्या स्वागतानंतर काळाचा घाला

सुरज सारंगे हे अलिबाग वनविभागातील तिनविरा येथे वनरक्षक म्हणून कार्यरत होते. अवघ्या पाच दिवसांपूर्वीच त्यांना जुळ्या मुलांचे पितृत्व लाभले होते. दोन्ही बालके कालच रुग्णालयातून घरी आली होती. या आनंदाच्या क्षणांचे स्टेटस त्यांनी मोबाईलवर ठेवले होते. मात्र, मुरुड तालुक्यातील सर्वे येथील आपल्या घरी जात असताना नियतीने त्यांच्यावर घाला घातला आणि एका उमद्या अधिकाऱ्याचा अंत झाला.

Suraj Sarange Forest Guard
T-20 World Cup | मध्य रेल्वेद्वारे T-20 विश्वचषक अंतिम सामन्यासाठी मुंबई, पुण्यातील क्रिकेट चाहत्यांसाठी विशेष गाड्या

सुरक्षेचा अभाव: कंत्राटदारावर गंभीर आरोप

रेवस-रेड्डी मार्गाचे काम सध्या सुरू आहे. सर्वे नजीक चिकणी जवळ नवीन मोरी बांधण्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. महाराष्ट्र वनरक्षक व वनपाल संघटनेचे अलिबाग अध्यक्ष मयुरेश तायडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, तिथे कंत्राटदाराचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे.

Suraj Sarange Forest Guard
Maharashtra Budget 2026 | मत्स्यसंपदा योजनेसाठी अर्थसंकल्पात 1,200 कोटी रुपयांची भरीव तरतूद

अपघाताची प्रमुख कारणे:

कामाच्या ठिकाणी कोणतेही बॅरिकेट्स लावले नव्हते.

वाहनचालकांसाठी कोणतेही सूचना फलक नव्हते.

रात्रीच्या वेळी खड्डा दिसावा यासाठी रेडियम पट्ट्या किंवा लाल दिवे बसवण्यात आले नव्हते.

अंधार असल्याने सारंगे यांना खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि त्यांची दुचाकी थेट खोल खड्ड्यात कोसळली.

Suraj Sarange Forest Guard
Tadgola fruit : वाढत्या ऊन्हामुळे पर्यटकांची ताडगोळ्यांना पसंती

सखोल चौकशीची मागणी

या घटनेमुळे संपूर्ण वनविभागात आणि रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. कंत्राटदार आणि संबंधित प्राधिकरणाच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वनरक्षक व वनपाल संघटनेने पत्रकाद्वारे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news