पुणे

हवेलीचे प्रांताधिकारी आसवले यांनी तयारीची केली पाहणी

अमृता चौगुले

उरुळी कांचन :पुढारी वृत्तसेवा: संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा (दि. 25) विसाव्यासाठी उरुळी कांचननगरीत दाखल होत असल्याने पालखी सोहळ्याची तयारीची पाहणी हवेलीचे उपविभागीय महसुल अधिकारी संजय आसवले यांनी केली. नियोजनासाठी महसूल, आरोग्य, पोलिस प्रशासनास योग्य सूचना दिल्या आहेत. संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा लोणी काळभोरचा शुक्रवार ( दि.24) चा मुक्काम उरकून यवत (दि.25) मुक्कासाठी उरुळी कांचन नगरीत विसाव्यास थांबणार आहे. या मुक्कामासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे.

ग्रामपंचायत उरुळी कांचन यांच्या वतीने या सोहळ्यासाठी विसावा घेणार्‍या वारकर्‍यांसाठी सर्व स्थळांची तयारी सुरू आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत, महसूल प्रशासन यांनी सर्व आवश्यक बाबी पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गावरील पडलेला राडारोडा व आवश्यक दुरुस्तीची कामे काम पूर्ण केली आहेत. महावितरणकडून लोणी काळभोर ते उरुळी कांचनपर्यंत आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे.

आरोग्य विभागाकडून वारकर्‍यांसाठी आवश्यक उपचार कक्ष, कोरोना खबरदारी म्हणून स्थानिक रुग्णालयांत बूस्टर डोस, तसेच आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने पिण्याच्या पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण, औषध फवारणी व इतर खबरदारी घेण्यासाठी उरुळी कांचन आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता कदम प्रयत्न करीत आहेत.

उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून स्वागत तयारी, स्वच्छता, पाणी पुरवठा नियोजन, अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती सरपंच राजेंद्र कांचन यांनी दिली. तयारीच्या पाहणीसाठी हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के, सहायक पोलिस निरीक्षण किरण धायगुडे, मंडल अधिकारी नूरजहाँ सय्यद, माजी सरपंच संतोष कांचन, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, डॉ. सुचिता कदम आदी उपस्थित होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT