शेर पुलाजवळ बॅरिकेडिंग; भवानीनगर परिसरात पालखी सोहळा कामाला वेग | पुढारी

शेर पुलाजवळ बॅरिकेडिंग; भवानीनगर परिसरात पालखी सोहळा कामाला वेग

भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा: जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी भवानीनगर (ता. इंदापूर) येथील शेर पुलाजवळ पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूंनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा बारामती येथे दि. 29 जून रोजी मुक्काम होत असून, दि. 30 जून रोजी सकाळी पालखी सोहळा सणसर मुक्कामासाठी प्रस्थान ठेवणार आहे. पालखी सोहळा बारामती-इंदापूर रस्त्यावरून सणसर मुक्कामी येत असताना भवानीनगर येथील शेर पूल हा निरा डावा कालव्यावर आहे.

या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठा खड्डा आहे तसेच या ठिकाणी पालखी मार्ग अरुंद आहे. त्यामुळे पालखी या पुलावरून जात असताना सोहळ्याच्या स्वागतासाठी इंदापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ शेर पुलाजवळ येतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्या गर्दीत वारकर्‍यांचा पाय घसरून अपघात होऊ नये, यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.शेर पुलापासून सुमारे 100 ते 200 मीटरपर्यंत पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूला लाकडी खांब रोवून त्यांना आडवे बांबू व पत्रे बांधले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी बॅरिकेडिंग केल्यामुळे वारकर्‍यांच्या सुरक्षिततेसाठी फायदा होणार आहे.

हेही वाचा

सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यातील मुक्कामस्थळांची पाहणी

नगर :शहरात नागरिकांना सुविधा देण्यास कटिबद्ध : महापौर

बीड : पंकजा मुंडेंनी आष्टीतून फुंकले जि. प. निवडणुकीचे रणशिंग

Back to top button