नगर :शहरात नागरिकांना सुविधा देण्यास कटिबद्ध : महापौर | पुढारी

नगर :शहरात नागरिकांना सुविधा देण्यास कटिबद्ध : महापौर

नगर : पुढारी वृत्तसेवा: शहरातील बर्‍याच भागातील पाणी, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, रस्ते अशी अनेक कामे गेल्या काही दिवसांत पूर्ण झाली आहेत. त्यामुळे शहराची वाटचाल विकासाकडे सुरू आहे. नागरिकांना सर्व सुविधा देण्यास कटिबद्ध आहोत. आज होत असलेल्या रस्ता डांबरीकरणामुळे नागरिकांची मोठी सोय होणार असल्याचे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.

प्रभाग क्रमांक बारामधील शिवम प्लाझा चौक ते जुनी मनपापर्यंतच्या डांबरीकरण कामाला महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, मनपा महिला बाल कल्याण सभापती पुष्पा बोरुडे, माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेवक दत्ता कावरे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, संतोष गेनाप्पा, संजय फुलसौंदर, सुरेश धोकरिया, अंकुश ढुमणे, अजय मिसाळ, शाहू लंगोटे, शंकर सोनवणे, सौरभ आहेर, संदीप गोडसे आदी उपस्थित होते.

माजी महापौर सुरेखा कदम म्हणाल्या, प्रभाग क्रमांक बारा मधील विविध विकास कामांना प्राधान्य देत नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या महापौर पदाच्या काळातही अनेक कामे मार्गी लावली, अजूनही त्यावेळची प्रास्तावित कामे आता मार्गी लागत आहेत. सूत्रसंचालन संतोष गेनाप्पा यांनी केले, तर आभार अप्पू बेद्रे यांनी मानले.

Back to top button