पुणे

…मग राजीनामा देता का? : रुपाली चाकणकर यांचा पंतप्रधानांना टोला

backup backup

पुणे; पुढारी ऑनलाईन: राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलल्यावरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी टोला लगावला आहे. लोक पंतप्रधानांचा राजीनामा मागताहेत, देताय का? म्हणत रुपाली चाकणकर यांनी मोदी यांना टोला लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दुपारी ट्विट करून राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामांतर करत असल्याचे जाहीर केले. या पुरस्काराला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नाव दिले आहे. यावरून देशभरात मतमतांतरे व्यक्त होत आहेत.

ओडिसा सरकारने महिला आणि पुरुष संघाला प्रायोजकत्व दिल्याने ऑलिम्पिकमध्ये दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली आहे.

त्यामुळे मोदींनी केवळ प्रसिद्धीसाठी असले उद्योग करू नयेत अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

यात अनेक राजकीय व्यक्तींनी गुजरातमधील स्टेडियमला दिलेल्या नरेंद्र मोदी यांचे नावही बदलावे अशी मागणी केली आहे.

याबाबत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलाच टोला हाणला आहे.

त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'जनतेची मागणी म्हणून खेलरत्न पुरस्कारांचं नाव बदललं म्हणे…चांगलं आहे.

जनतेच्या अजूनही काही छोट्या छोट्या मागण्या आहेत , महागाई कमी करा, युवकांना रोजगार द्या, महिलांना सुरक्षा द्या,

शेतकऱ्यांना सन्मान द्या आणि तुम्ही राजीनामा द्या.

जनतेच इतकी मागणी असेल तर तुम्ही तातडीने राजीनामा द्यायला हवा.

रुपाली चाकणकर यांचे हे ट्विट प्रचंड व्हायरल होत असून त्यावर प्रतिक्रियाही उमटत आहेत.

हेही वाचा: 

SCROLL FOR NEXT