पुणे: वारजे माळवाडी पोलिसांनी दोन घरफोड्यांचा छडा लावत रोकड आणि सोन्याचे दागिने असा दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. वारजे माळवाडी आणि उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत या घरफोड्या झाल्या होत्या. त्यातील एका घरफोडीत पुतण्यानेच चुलत्याचे घर फोडून धूम ठोकली होती.
उत्तमनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात चोरट्यांनी 580 ग््रॉम सोन्याचे दागिने आणि साडेचार लाख रुपयांची रोकड चोरी केली होती. आरोपीने घरफोडी करताना विशेष काळजी घेतली होती. त्याने आपला चेहरा कोणाला दिसून नये म्हणून झाकून घेतला होता, तर चोरी केल्यानंतर रिक्षातून तो फरार झाला होता. रिक्षाची नंबरप्लेट देखील त्याने झाकून ठेवली होती. दरम्यान, वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे आणि त्यांच्या पथकाला तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयित आरोपीची माहिती मिळाली होती.
पोलिसांनी चोरट्याने पळून जाण्यासाठी वापरलेली रिक्षा शोधून काढली होती. रिक्षामालकाकडे चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की, माझी रिक्षा अरविंद प्रल्हादसिंग राजपुरोहित (वय 29, रा. वाघजाईनगर, म्हाळुंगे) हा घेऊन गेल्याचे सांगितले. तपासात राजपुरोहित हा घरफोडी झालेल्या व्यक्तीचा पुतण्या असल्याचे समोर आले. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी घरफोडी केलेला सर्व मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे, पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी त्याने प्रत्येक खबरदारी घेतली होती.
त्याचप्रमाणे वारजे पोलिसांनी एका देवऋषीच्या घरातून चोरट्यांनी सोन्यासह रोकड चोरी केली होती. त्या गुन्ह्याचा देखील छडाा लावत तिघांना अटक केली आहे. अजय भागवत फपाळ (वय 19), कैलास दत्ता फपाळ (वय 25, दोघे रा. म्हाळुंगे, उत्तमनगर, मूळ माजलगाव, बीड), बालाजी मधुकर ढगे (वय 24, रा. न्यू अहिरेगाव, मूळ वडवणी, बीड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चौकशीत आरोपी ढगे याच्या ताब्यातून 180 ग््रॉम सोन्याचे
दागिने आणि दहा लाखांची
रोकड आरोपी कैलासच्या ताब्यातून 194 ग््रॉम वजनाचे दागिने, 19 लाख 24 हजार रुपयांची रोकड असा ऐवज जप्त केला. ही कामगिरी पोलिस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काईंगडे, प्रकाश धेंडे, नीलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे, कर्मचारी निखिल तांगडे, अमित शेलार, योगेश वाघ, सागर कुंभार, शरद पोळ, बालाजी काटे यांच्या पथकाने केली.