Sunburn Festival Mumbai Pudhari
पुणे

Sunburn Festival Mumbai: मुंबईत होणाऱ्या 'सनबर्न फेस्टिव्हल'ला विरोध

कार्यक्रम तत्काळ रद्द करण्याची नशाविरोधी अभियानाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : वादग्रस्त ठरलेला 'सनबर्न फेस्टिव्हल' यावर्षी गोवा आणि अन्य ठिकाणांवरून हद्दपार झाल्यानंतर १९ ते २१ डिसेंबरदरम्यान मुंबईतील शिवडी येथे आयोजित केला आहे.

महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरा आणि सामाजिक अस्मितेला धक्का पोहचविणारा तसेच व्यसनाधीनता वाढविणारा हा कार्यक्रम तत्काळ रद्द करावा, अशी मागणी नशाविरोधी संघर्ष अभियानाचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्राचे मार्गदर्शक ह.भ.प. भानुदास वैराट महाराज, अधिवक्ता मुग्धा बिवलकर, हिंदुत्वनिष्ठ ऋतुजा माने आणि हिंदू जनजागृती समितीच्या युवा संघटक प्राची शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.

चंद्रकांत वारघडे म्हणाले की, सनबर्न फेस्टिव्हलमुळे युवा पिढीच्या आरोग्य व सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तातडीने तक्रारही दाखल करण्यात आली आहे. यापूर्वीच्या उत्सवांमध्ये अमली पदार्थांचे सेवन व वितरणाचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत.

याशिवाय वर्ष २००९, २०१४ आणि २०२० मध्ये फेस्टिव्हल आयोजकांनी गोवा सरकारचा तब्बल ६ कोटी २९ लाख रुपयांचा कर बुडवला होता. त्या प्रकरणात सप्टेंबर २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने 'सनबर्न फेस्टिव्हल'ची १ कोटी १० लाख रुपये सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्याचा आदेश दिल्याचे संघटनेने सांगितले.

या पार्श्वभूमीवर, करचुकवेगिरी करणाऱ्या आणि तरुण पिढीला नशेकडे ढकलणाऱ्या अशा कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी का दिली? असा सवाल देखील संघटनेने उपस्थित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT