

पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन धारदार हत्यारांनी वार केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोथरूड येथील किष्किंधानगर येथील गजानन मित्रमंडळाजवळील एका घरात हा प्रकार घडला. दि. 6 डिसेंबर रोजी दुपारी पत्नी मुलांसह घरात एकटी झोपली असताना आरोपी पतीने पत्नीला तु ओंकारला फोन का केला होता, तुझा काय संबंध असे म्हणून चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ केली.
त्यानंतर हाताने मारहाण करून स्वयंकपाकघरातील वापरातील लोखंडी हत्याराने वार करून जखमी केले. याप्रकरणी आरोपी पतीवर पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.