Gavharwadi Leopard Capture: गावरवाडीत अखेर बिबट्या जेरबंद; १३ दिवसांच्या प्रयत्नांना यश

शेतातील पिंजऱ्यात पहाटे बिबट्या अडकला; तपासणीसाठी माणिकडोह केंद्रात हलविण्यात
Leopard Capture
Leopard CapturePudhari
Published on
Updated on

घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील गावरवाडी परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे ४ वाजता बिबट्या जेरबंद झाला. दि. २६ नोव्हेंबर रोजी शेतकरी सुधीर शिवाजी पोखरकर यांच्या शेतात हा पिंजरा लावण्यात आला होता. तब्बल १३ दिवसानंतर सोमवारी (दि. ८) रोजी बिबट्या पिंजऱ्यात अडकला. घोडेगाव वनपरिक्षेत्रात आतापर्यंत ६ बिबट्यांना पकडण्यात आले आहे.

Leopard Capture
Police Patil Nagpur March: पोलिस पाटलांचा नागपूरला भव्य मोर्चा

बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पकडलेल्या बिबट्याला प्राथमिक तपासणीसाठी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्र, जुन्नर येथे हलवण्यात आले.

Leopard Capture
Pune Women Accident: शहरात दोन वेगवेगळे अपघात; दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू

पुढील प्रक्रिया म्हणून या बिबट्याला वनतारा गुजरात किंवा देशातील अन्य प्राणी संग्रहालयात, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या परवानगीनुसार सुरक्षितरित्या पाठविण्यात येईल, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news