

पुणे : गावठी हातभट्टी दारू धंद्यावर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
थेऊर फाट्याजवळ, राखपसरेवस्ती परिसरात सुरू असलेला दारूधंदा उद्ध्वस्त करण्यात आला. त्या ठिकाणाहून हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य, २३५ लीटर हातभट्टी रसायन असा १२ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
आरोपींविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमानुसार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर फाटा परिसरात अवैधरीत्या दारूनिर्मितीची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ७ डिसेंबरला वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या पथकाने राखपसरेवस्ती, बेट वस्ती (ता. हवेली) याठिकाणी छापा टाकला.
त्यावेळी एक महिला गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन तयार करताना मिळून आली. लोणी काळभोर पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे अनुषंगाने ११ महिन्यांच्या कालावधीत १०३ कारवाया करण्यात आल्या आहेत. अवैध गांजा विक्रीवर १४, अवैध जुगारांवर ३५ , अवैध गुटखा विक्री, वाहतूक व साठाधारकावर कारवाई केली आहे.