Gram Panchayat Pudhari
पुणे

Shirur Gram Panchayat Election 2026: शिरूर तालुक्यात 71 ग्रामपंचायतींची मुदत संपताच निवडणूक रणधुमाळीला सुरुवात

थेट सरपंच निवडणुकीमुळे चुरस वाढणार; तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, कोरेगाव भीमा आदी मोठ्या ग््रामपंचायतींवर सर्वांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

टाकळी भीमा: शिरूर तालुक्यातील 71 ग््राामपंचायतींची मुदत येत्या 23 व 24 फेबुवारीदरम्यान संपत असून, प्रभागरचनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे गावपातळीवरील राजकीय हालचालींना वेग आला आहे. एप्रिल, मे महिन्यात निवडणुका होण्याचा अंदाज व्यक्त होत असून, इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच तयारीला सुरुवात केली आहे.

सरपंचपदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने यंदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विविध गावांमध्ये पॅनेल निश्चित करण्यासाठी बैठका सुरू असून, ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मनधरणी, मतदारसंघनिहाय आढावा आणि खर्चाची तजवीज यावर चर्चा सुरू आहे.

तालुक्यातील धानोरे, कासारी, कळवंतवाडी, करडे, आंबळे, चव्हाणवाडी, ढोकसांगवी आदी सात ग््राामपंचायतींवर सध्या प्रशासक नेमण्यात आले आहेत. उर्वरित ग््राामपंचायतींची मुदत संपत असल्याने प्रशासक नियुक्तीची प्रक्रिया सुरू असून, संबंधित यादी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आल्याची माहिती मिळते. आवश्यकतेनुसार एका प्रशासकीय अधिकाऱ्याकडे पाच ते सहा ग््राामपंचायतींचा अतिरिक्त कार्यभार सोपवावा लागण्याची शक्यता आहे.

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर आता ग््राामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासक नियुक्तीनंतर निवडणुकीची रणधुमाळी अधिक रंगण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

मोठी बाजारपेठ असलेल्या ग््राामपंचायतींवर लक्ष

मुदत संपणाऱ्या ग््राामपंचायतींमध्ये तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, सणसवाडी, पाबळ, न्हावरा, निमोणे, इनामगाव, कवठे यमाई, कारेगाव, वडगाव रासाई, केंदूर, कोरेगाव भीमा आदी मोठ्या बाजारपेठांचा समावेश आहे. या ग््राामपंचायतींवर वर्चस्व मिळवण्यासाठी स्थानिक नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जसे सोयरे-भावकीसह विविध गट सक्रिय झाले होते, तसेच चित्र ग््राामपंचायत निवडणुकीतही पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT