चक्रीवादळाची निर्मिती Pudhari
पुणे

Shakti Cyclone Arabian Sea 2025: अरबी समुद्रात ‘शक्ति’ चक्रीवादळ; किनारपट्टीला धोका आहे का, मच्छीमारांना काय इशारा?

वादळाचा थेट जमिनीवर परिणाम होणार नाही; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा, राज्यात 8 ते 15 ऑक्टोबरदरम्यान परतीच्या पावसाचा अंदाज

पुढारी वृत्तसेवा

पुणे : अरबी समुद्रात काल (शुक्रवारी) रात्री दीड वाजता हंगामातील पहिले शक्ती चक्रीवादळ तयार झाले मात्र याचा भारतीय आणि महाराष्ट्र किनारपट्टी वर मोठा परिणाम होणार नाही असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान गुजरात मध्ये अडखळलेला मान्सून महाराष्ट्रात 8 ते 10ऑक्टोबर दरम्यान येईल आणि तो 13 ते 15ऑक्टोबर दरम्यान पुढे दक्षिण भारतात जाईल असा अंदाज असे भारतीय हवामान विभागाने शनिवारी सकाळी दिला आहे.(Latest Pune News)

गेले काही दिवस अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने नवरात्री उत्सवात खूप पाऊस झाला त्याचे शुक्रवारी मध्यरात्री ते तीव्र कमीदाबाच्या पट्ट्यात रूपांतर होऊन शनिवारी पहाटे चक्रीवादळ तयार झाले. सध्या ते द्वारकेच्या पश्चिमेला सुमारे २५० किमी अंतरावर आहे. आज शनिवारी दुपारी त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्यानेविभागाच्या अंदाजानुसार याचा भारतीय भूभागावर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता नाही. मात्र आठवड्याच्या शेवटी समुद्राची परिस्थिती खवळण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी रात्री 1 वाजेपर्यंत चक्रीवादळ शक्ति हे ईशान्य अरबी समुद्रावर २१७ उत्तर अक्षांश आणि ६६.५ पूर्व रेखांशाच्या जवळ, नल्याच्या नैऋत्येस सुमारे २७० किमी, पोरबंदरच्या पश्चिमेस ३०० किमी आणि पाकिस्तानमधील कराचीच्या दक्षिणेस ३६० किमी अंतरावर होते

हंगामातील पहिले तीव्र वादळ...

शक्ती चक्रीवादळ ५ ऑक्टोबरपर्यंत उत्तर आणि लगतच्या मध्य अरबी समुद्राच्या मध्य भागात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे

मच्छिमारांना सावधानेचा सल्ला देण्यात आला आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये काही प्रमाणात जोरदार पाऊस पडेल. तसेच ५ ऑक्टोबरपर्यंत दुपारी ते उत्तर आणि लगतच्या मध्य अरबी समुद्राच्या मध्य भागात धडकण्याची शक्यता आहे.याचे

तीव्र चक्रीवादळात रूपांतर होईल, परंतु गुजरातच्या किनारपट्टीजवळ येण्यापूर्वी ते लक्षणीयरीत्या कमकुवत होईल. मात्र पाऊस पडण्याची शक्यता आहे.

थेट जमिनीकडे येणार नाही...

वादळाची हालचाल पश्चिम-वायव्येकडे आहे. सुरुवातीला आणि नंतर पश्चिम-नैऋत्येकडे आहे. ही प्रणाली जमिनीवर थेट परिणाम करणार नाही परंतु समुद्राच्या परिस्थितीवर परिणाम करेल. मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT