Mutha Dam Release Pune: धरणसाखळी भरली, मुठा नदीला वाढलेला विसर्ग

घाटमाथ्यावरच्या रिमझिम पावसामुळे चारही धरणांतून पाणी सोडले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Dam Release Pune
मुठा नदीला वाढलेला विसर्गPudhari Photo
Published on
Updated on

खडकवासला : पानशेत, वरसगाव धरण खोऱ्यातील घाटमाथ्यावरील होत असलेल्या रिमझिम पावसामुळे खडकवासला धरण साखळी शंभर टक्के भरून वाहू लागली आहे. त्यामुळे चारही धरणांतून विसर्ग सुरू केला आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 2 हजार 568 क्युसेकपर्यंत वाढ केली.(Latest Pune News)

Dam Release Pune
Yedgaon Canal Repair: येडगाव कालव्याचे अस्तरीकरण निखळले; शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

बुधवारी (दि. 1) सायंकाळी पाच वाजता खडकवासला धरण साखळीत 29.15 टीएमसी म्हणजे शंभर टक्के पाणीसाठा झाला. मंगळवारी (दि. 30) सकाळी सहा ते बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत अनुक्रमे वरसगाव धरण परिसरात 17, पानशेत परिसरात 18, टेमघर परिसरात 12 व खडकवासला धरण परिसरात 4 मिलिमीटर पाऊस पडला. धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने धरण साठ्यात पाण्याची आवक वाढली. त्यामुळे पानशेतमधून 600, वरसगावमधून 600 तर टेमघरमधून 300 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.

Dam Release Pune
Asha Workers Salary Delay: सहा महिने पगार नाही! साहेब, तुम्हीच सांगा, घर कसे चालवायचे?

नदी काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जादा पाणी सोडूनही खडकवासला धरणाची पातळी 95 टक्क्यावर स्थिर आहे.

Dam Release Pune
Dussehra Nirmalya Pune: दसऱ्यानंतर होणाऱ्या कचऱ्याकडे पालिका यंदातरी लक्ष देणार का?

धरण माथ्यावर उघडीप असली तरी घाटमाथ्यावरील रिमझिमीने पाण्याची आवक कमी-जास्त होत आहे. धरणांतून जादा पाणी सोडण्यासाठी 24 तास यंत्रणा सज्ज केली आहे. पावसाचा जोर कमी असल्याने मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात नाही, असे असले तरी मुठा नदी वेगाने वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, जलसंपदा विभाग, खडकवासला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news