Sorghum Pudhari
पुणे

Saswad Sorghum Market Rate: सासवड उपबाजारात ज्वारीला तब्बल 4 हजारांचा दर!

पुरंदर, बारामती, दौंडसह विविध भागातून मोठी आवक; गूळ बाजारातही 80 क्विंटल आवक

पुढारी वृत्तसेवा

सासवड: पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड (ता. पुरंदर) येथील उपबाजारात धान्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. बुधवारी (दि. 10) ज्वारीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 4 हजार रुपयांचा दर मिळाल्याची माहिती निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली.

सासवड उपबाजारात वाल्हा, राजुरी, वाघापूर, माळशिरस, गराडे, परिंचे, वीर, दिवे यासह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते.

बुधवारी सासवड उपबाजारात एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 4 हजार रुपये, तर दोन नंबर प्रतिच्या ज्वारीला किमान 2 हजार 500 हजार रुपये, तर सरासरी 3 हजार 250 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला, असे निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले.

या वेळी सभापती संदीप फडतरे, उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, महादेव टिळेकर, वामन भाऊ कामठे, गणेश होले, देविदास कामठे, सुशांत कांबळे, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, शरयू वाबळे, भाऊसाहेब गुलदगड, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास कांबळे यासह व्यापारी आर. के. ट्रेडर्सचे रुपचंद कांडगे, आर. आर. ट्रेडर्सचे राजेंद्र जळींद्रे, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, शैलेश वीरकर आदी उपस्थित होते.

दरम्यान निरा येथील बाजार समितीच्या आवारात गुळाची आवक 400 बॉक्स म्हणजे 80 क्विंटल असल्याची माहिती गूळबाजाराचे सहसचिव नितिन किकले, कृष्णात खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी दिली. या वेळी गूळ व्यापारी शांतिकुमार कोठडिया उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT